Tharla Tar Mag Serial : स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘ठरलं तर मग’ मध्ये सध्या अनेक ट्विस्ट आणि टर्न्स पाहायला मिळत आहेत. मालिकेत अद्वैत आणि कलाची एंट्री झाली असून ते दोघेही सायली आणि अर्जुनला मदत करत आहेत.
आजच्या भागात कला सायलीला मेहंदी काढत आहे. यावेळी कला तिच्या मनातल्या अद्वैतबद्दलच्या भावना सायलीसोबत शेअर करते. ती सांगते की दोघांमध्ये अजून प्रेम नसलं तरी तिला अद्वैतबद्दल खूप काहीतरी खास वाटतं. दुसरीकडे प्रिया मेहंदीसाठी खूप उत्सुक असते. तितक्यात अद्वैत कलाला फोन करतो आणि दोघांमध्ये नेहमीप्रमाणे भांडणं सुरू होतात. सायली आणि कुसुम त्यांची भांडणं पाहून हसतात.
कला अद्वैतला सांगते की तिच्यासोबत असलेली पिशवी त्याच्याकडेच आहे आणि त्यामध्ये शेण आहे, ते मेहंदीच्या कोनमध्ये भरायचं आहे. शेणात हात घालायचा म्हटल्यावर अद्वैत आधी नकार देतो, पण नंतर कला त्याला समजावते की हे सगळं सायली आणि अर्जुनला एकत्र आणण्यासाठी करत आहोत, तेव्हा तो तयार होतो. मेहंदीवाल्याकडून कोन घेऊन तो स्वतःच्या हाताने शेण भरतो आणि तो कोन मेहंदीवाल्याला देतो. तो तिला सांगतो की याच कोनमधली मेहंदी प्रियाच्या हातावर काढायची आहे. जर कुणाला काही संशय आला तर ‘हे नेहमीचंच आहे’ असं सांगून वेळ मारून घ्या.
अद्वैत अर्जुनला भेटायला जातो. अर्जुनच्या हाताला जखम झालेली असते. अर्जुन त्याला सांगतो की प्रियाला त्याच्या नावाची मेहंदी काढायची होती, पण आता त्याच्या हातावर जखम असल्यामुळे ती कशी काढणार, हे त्याला बघायचं आहे. अद्वैत अर्जुनची समजूत काढतो आणि त्याला विचारतो की तो हे लग्न का करत आहे? त्याचे सायलीवर इतके प्रेम असूनही तो हा वेडेपणा का करत आहे? अर्जुन त्याला सांगतो की त्याला त्याच्या पूर्णा आजीच्या तब्येतीसाठी हे सगळं करावं लागत आहे.
कधी नव्हे ते अद्वैत कलाचं कौतुक करतो. तो म्हणतो की माझं लग्न ठरलं तेव्हा ती मांडवातून पळून गेली होती, पण आबांसाठी मी तिच्याशी लग्न केलं. आता आमच्यात खूप भांडणं होतात, आमचं एकमेकांशी पटत नसलं तरी ती आबांसाठी एक परफेक्ट सून आहे. ती सगळ्यांशी जुळवून घेते, सगळ्यांसाठी खूप काही करते आणि खोटेपणाविरोधात उभी राहते. अर्जुनला काहीच सुचत नसतं, तेव्हा अद्वैत त्याला धीर देतो आणि सांगतो की काळजी करू नको, तुझं लग्न फक्त सायलीशीच होणार आहे.
इकडे मेहंदीवाली मेहंदी काढत असते, तेव्हा कोन शेणाचा असल्यामुळे घरात सगळ्यांना वास येऊ लागतो, पण तो वास कशाचा आहे हे कोणालाच समजत नाही. प्रतिमा मेहंदी काढायला नकार देते, कारण तिला हे लग्न होऊ नये असंच वाटत असतं. दुसरीकडे सायलीच्या हातावर अर्जुनच्या नावाची मेहंदी कलाने काढलेली असते. कुसुमताईला थोडी काळजी वाटते की सायलीने ठरवलेला प्लॅन व्यवस्थित पार पडेल की नाही. तेव्हा सायली तिला शांत करते आणि समजावते.
या भागात अद्वैतने कलाबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच, सायली आणि अर्जुनला एकत्र आणण्यासाठी अद्वैत आणि कला प्रयत्न करत आहेत. आता पुढे काय होणार, हे पाहणं महत्त्वाचं आहे.