महिलांसाठी पर्यटन क्षेत्रात भरारी घेण्याची संधी! कृषी पर्यटन व्यवसायासाठी शासनाकडून विशेष सवलत, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया!

पर्यटन क्षेत्रात महिलांच्या क्षमता ओळखून त्यांना उद्योजक बनण्यास आणि नेतृत्वगुण विकसित करण्यास मदत करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाने एक महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. १९ जून २०२३ रोजी जाहीर झालेले ‘आई’ महिला केंद्रित/लिंग समावेशक पर्यटन धोरण याच उद्देशाने तयार करण्यात आले आहे. या धोरणांतर्गत महिलांसाठी कृषी पर्यटन व्यवसाय सुरू करण्यासाठी विशेष सवलती देण्यात येत आहेत. या संधीचा लाभ कसा घ्यायचा, याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.

‘आई’ महिला केंद्रित पर्यटन धोरणाची पंचसूत्री:

हे धोरण खालील पाच प्रमुख तत्वांवर आधारित आहे:

१. महिला उद्योजकता विकास: महिलांना स्वतःचा पर्यटन व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देणे.

२. महिलांकरिता पायाभूत सुविधा: पर्यटन स्थळांवर महिलांसाठी आवश्यक सोयीसुविधा निर्माण करणे.

३. महिला पर्यटकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य: महिला पर्यटकांना सुरक्षित आणि भयमुक्त वातावरणाचा अनुभव देणे.

४. महिला पर्यटकांसाठी कस्टमाईज्ड उत्पादने/सवलती: महिला पर्यटकांच्या आवडीनिवडीनुसार विशेष उत्पादने आणि सवलती उपलब्ध करणे.

5. प्रवास आणि पर्यटन विकास: राज्याच्या पर्यटन विकासात महिलांचा सक्रिय सहभाग वाढवणे.

पर्यटन संचालनालयामार्फत आकर्षक प्रोत्साहने आणि सवलती:

या धोरणांतर्गत, महिलांना पर्यटन क्षेत्रात नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा कार्यरत व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले जात आहे. बँकेने रु. १५ लाखांपर्यंत कर्ज मंजूर केलेल्या महिलांनी कर्जाचे हप्ते वेळेत भरल्यास, भरलेल्या हप्त्यातील व्याजाची रक्कम परत मिळू शकते. ही व्याज परताव्याची रक्कम खालील अटींच्या अधीन राहून पर्यटन संचालनालयामार्फत दिली जाईल:

  • परताव्याची कमाल मर्यादा १२% व्याजदर किंवा कर्ज परतफेडीचा कालावधी ७ वर्षे किंवा व्याजाची एकूण रक्कम रु. ४.५० लाख, यापैकी जे आधी घडेल ते लागू होईल.

व्याज परताव्यासाठी आवश्यक अटी:

व्याज परताव्याचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराला खालील अटी पूर्ण करणे आवश्यक आहे:

१. पर्यटन व्यवसाय पूर्णपणे महिलेच्या मालकीचा असावा आणि तिनेच तो चालवलेला असावा. २. महिलांच्या मालकीच्या व्यवसायात व्यवस्थापकीय आणि इतर कर्मचाऱ्यांमध्ये किमान ५०% महिला असणे अनिवार्य आहे. 3. पर्यटन व्यवसायासाठी आवश्यक असलेले सर्व परवाने प्राप्त केलेले असावेत. 4. लाभार्थीचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असणे आवश्यक आहे. 5. कर्जाचे सर्व हप्ते वेळेवर भरलेले असावेत. 6. लाभार्थी महिला, तिचा पर्यटन व्यवसाय आणि कर्ज देणारी बँक महाराष्ट्रात स्थित असणे आवश्यक आहे.

अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रे:

या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी खालील सूचनांचे पालन करावे आणि कागदपत्रे तयार ठेवावी:

क्र.कागदपत्र/माहितीअनिवार्य / आवश्यकतेनुसार
१विहित नमुन्यातील अर्ज (पर्यटन विभागाच्या वेबसाइटवर उपलब्ध)अनिवार्य
२रु. ५०/- प्रक्रिया शुल्क भरल्याची पावतीअनिवार्य
३अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटोअनिवार्य
४व्यवसाय महिलेच्या मालकीचा असल्याचे प्रमाणित करणारे रु. ५००/- च्या स्टॅम्प पेपरवरील नोटरी केलेले प्रतिज्ञापत्रअनिवार्य
५ओळखीचा पुरावा (आधार कार्ड / पासपोर्ट / ड्रायव्हिंग लायसन्स / मतदार ओळखपत्र) – यापैकी कोणतेही एकअनिवार्य
६अर्जदाराचे वैयक्तिक आधार कार्डअनिवार्य
७पॅन कार्डअनिवार्य
८आधार लिंक असलेल्या बँक खात्याच्या पासबुकची छायांकित प्रत किंवा रद्द केलेला चेकअनिवार्य
९पर्यटन व्यवसायाच्या पत्त्याचा पुरावा (उद्योग नोंदणी प्रमाणपत्र / वीज बिल / दुकान आणि स्थापना परवाना) – यापैकी कोणतेही एकअनिवार्य
१०पर्यटन केंद्र/व्यवसाय/उद्योगाची मालकी दर्शवणारे कागदपत्र (महिला अर्जदाराच्या नावावरील ७/१२ उतारा / प्रॉपर्टी कार्ड / ८-अ नमुना किंवा नोंदणीकृत भाडे करार)आवश्यकतेनुसार
११अन्न व औषध प्रशासन परवानाआवश्यकतेनुसार
१२पर्यटन व्यवसायासाठी आवश्यक असलेली इतर नोंदणी/परवाना/कागदपत्रे (उदा. निधी पोर्टल नोंदणी / पर्यटन संचालनालय नोंदणी / पर्यटन विकास महामंडळाकडे नोंदणी प्रमाणपत्र प्रत)व्यवसायाच्या स्वरूपानुसार अनिवार्य
१३प्रकल्प संकल्पनेची संक्षिप्त माहिती (५०० शब्दांमध्ये, एका पानावर)अनिवार्य
१४जीएसटी क्रमांकआवश्यकतेनुसार

परिपूर्ण भरलेला अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे सादर केल्यानंतर, जर ती योग्य आढळल्यास पर्यटन संचालनालयाकडून सशर्त हेतू पत्र (Letter of Intent) दिले जाईल.

हे हि वाचा: Business idea | ह्या व्यवसायांना सरकार देईल मोठी सबसिडी(मुद्रा योजना)! हे व्यवसाय करा चालू!

कर्ज परताव्यासाठी पर्यटन विभागाच्या अटी आणि शर्ती:

  1. पर्यटन संचालनालयाकडून मिळालेल्या सशर्त हेतू पत्राच्या आधारावर लाभार्थी महिलेने बँकेकडून कर्ज मंजूर करून घ्यावे.
  2. अर्जदार महिलेने कर्जाची नियमित परतफेड करणे आवश्यक आहे. प्रत्येक हप्ता भरल्यानंतर व्याजाची रक्कम (१२% च्या मर्यादेत) लाभार्थीच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात पर्यटन संचालनालयामार्फत जमा केली जाईल.
  3. पर्यटन व्यवसाय सुरू असल्याचे दर्शवणारे फोटो सादर करावे लागतील.
  4. व्याजाच्या रकमेव्यतिरिक्त इतर कोणतेही शुल्क/फी दिली जाणार नाही.
  5. कर्ज देणारी बँक खालील अटी पूर्ण करणारी असावी:
    • महाराष्ट्रामध्ये स्थित असणे आवश्यक.
    • कोअर बँकिंग प्रणाली (CBS) युक्त असावी.
    • भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) नियमांअंतर्गत कार्यरत असावी.
  6. कर्ज घेताना क्रेडिट गॅरंटी स्कीममध्ये सहभागी होणे बंधनकारक आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क:

या योजनेबद्दल अधिक माहिती हवी असल्यास, आपण खालील क्रमांकावर संपर्क साधू शकता:

दूरध्वनी क्रमांक: ८०८००३५१३४ / ०२०-२९९००२८९

कार्यालयीन वेळ: सकाळी १० ते सायंकाळी ०६ पर्यंत.

महिला सक्षमीकरणाला चालना देणारी ही महत्त्वपूर्ण योजना महिला उद्योजकांसाठी एक उत्तम संधी आहे. कृषी पर्यटन क्षेत्रात स्वतःचा व्यवसाय सुरू करून आर्थिकदृष्ट्या सक्षम बनण्याची इच्छा असणाऱ्या महिलांनी या संधीचा नक्कीच लाभ घ्यावा!

Leave a Comment