Marathi Ukhane for Female – मराठी उखाणे (लग्नासाठी) Female 2024, गृह प्रवेश करतानाचे उखाणे

Marathi Ukhane for Female: मराठी उखाणे शोधत आहात? तुम्हाला आवडतील अशी छान छान मराठी उखाणे इथेच मिळतील! लग्न, सणवार किंवा कोणत्याही खास प्रसंगासाठी, मराठी उखाणे तुमच्या आनंदात भर घालतील.

महाराष्ट्राची ही जुनी परंपरा खूपच मजेदार आहे. विशेषत: लग्नाच्या वेळी नवदंपतीला उखाणे घेऊन सर्वांना हसवण्याची संधी मिळते.

तुमचे लग्न ठरले आहे का? तर मग आधीच काही मजेदार उखाणे शिकून ठेवा. आम्ही तुम्हाला काही सोपे आणि लक्षात राहतील असे उखाणे शिकवू.

याशिवाय, आमच्या ब्लॉगवर तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि स्टायलिश शायरीही मिळतील.

Marathi Ukhane for Female (नवरीसाठी), गृह प्रवेश करतानाचे उखाणे 

आशीर्वाद घेण्यासाठी, जोडते दोन्ही हात, ___रावांचे नाव घेते, सोडा माझी वाट.
नागपूरची संत्री, रसरशीत आणि गोड, ___चं नाव घेते, खाऊन एक संत्र्याची फोड.
चांदीच्या ताटात मिठाई ची वाटी, ___रावांचे नाव घेते, सात जन्मासाठी.
प्रेमळ लोकांना आवडते, लव्ह शायरी, ___रावांचे नाव घेते, ओलांडते, मी घराची पायरी.
रुपेरी सागरावर, चंदेरी लाट, ___रावांचे नाव घेते, सोडा माझी वाट.
सर्व जमले आहेत, ___च्या दारात, ___रावांचे नाव घेते, येऊ द्या ना घरात.
हिरव्या जंगलात, झाडी घनदाट, ___रावांचे नाव घेऊनी एन्ट्री करते नव्या संसारात.
इंद्रधनुष्यामध्ये रंग आहेत सात, ___रावांचे नाव घेते, पाऊल टाकते आत.
मन मोहक फुले, उमलली झाडाला दाट, ___रावांचे नाव घेते, सोडा माझी वाट.
सासू सासऱ्यांच्या आशीर्वादासाठी वाकले, ___रावांचे नाव घेते, मी सासरी पाऊल टाकले.
स्वागत करायला जमले बंधू भगिनी, ___चे नाव घेते, मी तुमची वहिनी. 
**मायेने वाढवले, संस्कारांनी घडवले, ** ___चं नाव घेते, ___नी अडवले.
आम्ही दोघे मिळून, करू संसार सुंदर, मी भाजी करीन, ते लावतील कुकर.
सर्व जण सुखी राहावेत अशी करते प्रार्थना, ब्रम्हा, विष्णू, आणि महेश, ___रावांचे नाव घेते, करते गृहप्रवेश.
सर्व जमले आहेत लग्नघराच्या दारात, ___रावांचे नाव घेते, येऊ द्या ना घरात.
मंगल घडीला, आली आमची वरात, ___रावांचे नाव घेते, टाकून पहिले पाऊल घरात.
ढोल ताशाच्या तालावर, आली आमची वरात, ___रावांचे नाव घेऊनी, ___च्या दारात.
नवीन जीवन झाले सुरू, बहरू दे आमची संसारवेल, ___रावांचे नाव घेते, वाजवून ___च्या घराची बेल.

Leave a Comment