Light Pillars Japan: जपानच्या दैसेन शहरात आकाशात दिसलेले प्रकाशाचे खांब सोशल मिडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत. अनेकांना हे दिव्य किरण एलियनशी संबंधित असल्याची शंका येत आहे. परंतु या अद्भुत नजरेखाली वैज्ञानिक स्पष्टीकरण आहे.
काय दिसले?
जपानच्या सी ऑफ जपानच्या दिशेने दैसेन शहरातील लोकांनी रात्रीच्या आकाशात नऊ सरळ प्रकाशाच्या खांबांची मालिका पाहिली.
本日22時頃に鳥取大山町の御来屋港上空に光の筋を発見。 pic.twitter.com/c0Ce8OAEiK
— まーしー (@maashii_taiyo) May 11, 2024
या चमकणाऱ्या खांबांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि कल्पानांची उधळण सुरू झाली. काहींनी याला एलियन्सचे आगमन तर काहींनी हे एखादं रहस्यमय दिव्य चिन्ह असल्याचे म्हटले.
खरे तर काय?
शास्त्रज्ञांनी या प्रकाशाच्या खांबांचे रहस्य उलगडले आहे. ही दिव्य किरणे खरो तर मासेमारी करणाऱ्या जहाजांवरून येणारे दिवे आहेत. स्क्वीड मासेमारी करण्यासाठी जहाजंवर मोठे दिवे वापरतात जेणेकरून स्क्वीड या दिव्यांच्या दिशेने आकर्षित होतात आणि जाळ्यात सहज अडकतात. या दिव्यांचा प्रकाश रात्रीच्या थंड हवेमुळे वरच्या थरात तयार झालेल्या बर्फाच्या क्रिस्टल्सवर पडतो. त्यामुळे हे प्रकाशाचे खांब तयार होतात.
Light Pillars Japan: याआधीही झाले आहे का?
ही घटना याआधीही घडली आहे. सोशल मीडियावरील पोस्टनुसार, याच शहरात आकाशात २०१५ मध्ये देखील असेच प्रकाशाचे खांब दिसले होते. त्यावेळी देखील लोकांना याचे एलियन्सशी संबंध असल्याची शंका आली होती.
निष्कर्ष
जपानमध्ये दिसलेले प्रकाशाचे खांब हे एलियन्स किंवा एखादं रहस्य नसून केवळ मासेमारीशी संबंधित वैज्ञानिक घटना आहे. या घटनेमुळे आपल्याला हे लक्षात येते की, कधीकधी सामान्य गोष्टीही आपल्याला अचंबा करू शकतात.
Light Pillars Japan: जपानच्या शहरावर प्रकाशाचे खांब! एलियनशी संबंध आहे का?