Gas cylinder expiry: गॅस सिलेंडरची एक्सपायरी कधी आहे? हे लगेच ओळखा!

Gas cylinder expiry: गॅस सिलेंडरची एक्सपायरी कधी आहे? हे लगेच ओळखा!
आपण सर्वांना माहिती आहेच की, घरेलु वापरासाठी आपण गॅस सिलेंडर वापरतो. जेव्हा गॅस संपतो तेव्हा आपण नवीन सिलेंडर मागवतो आणि तो लीक होत नाही याची काळजी घेतो. पण आपण अनेकदा सिलेंडरची एक्सपायरी डेट तपासण्याकडे दुर्लक्ष करतो. सिलेंडरची एक्सपायरी डेट तपासणे खूप महत्वाचे आहे. कालबाह्य झालेला गॅस सिलेंडर स्फोट होऊ शकतो आणि त्यामुळे आपल्याला गंभीर दुखापत होऊ शकते किंवा आर्थिक नुकसानही सहन करावे लागू शकते.

Gas cylinder expiry: सिलेंडरची एक्सपायरी तारीख कशी तपासायची?

गॅस सिलेंडरवर जरा बारकाईने निरीक्षण केले तर तुम्हाला त्यावर तीन पट्ट्या आढळतील. या पट्ट्यांवर अक्षरे आणि आकडे असलेले कोड लिहिलेले असतात, उदाहरणार्थ A-23, B-24 किंवा C-25. या कोडमधील अक्षरे आणि आकडे वाचून आपण सिलेंडरची एक्सपायरी तारीख सहजपणे ओळखू शकता. Gas cylinder expiry.

या कोडमधील अक्षरे त्या सिलेंडरची एक्सपायरी होण्याचा महिना दर्शवित करतात. या अक्षरांचा अर्थ खालीलप्रमाणे आहे:

A – जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च
B – एप्रिल, मे आणि जून
C – जुलै ते सप्टेंबर
D – ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर
कोडमधील आकडा मात्र सिलेंडरची एक्सपायरी होण्याचे वर्ष दर्शवितो. उदाहरणार्थ, जर कोड B-24 असेल तर याचा अर्थ असा होतो की सिलेंडरची एक्सपायरी तारीख एप्रिल ते जून 2024 दरम्यान आहे.

सिलेंडरचे आयुष्य किती असते?

सामान्यतः एलपीजी गॅस सिलेंडरचे आयुष्य सुमारे 15 वर्षे असते. वापरात असलेल्या या सिलेंडरची दोनदा वेळोवेळी चाचणी केली जाते. पहिली चाचणी 10 वर्षांनी आणि दुसरी चाचणी 5 वर्षांनी केली जाते. Gas cylinder expiry.

तपासणी दरम्यान काय होते?

जेव्हा गॅस सिलेंडरची चाचणी केली जाते तेव्हा त्याची हायड्रो चाचणी केली जाते. या चाचणीमध्ये सिलेंडर पाचपट अधिक दाब सहन करू शकतो की नाही ते तपासले जाते. जर सिलेंडर ही चाचणी उत्तीर्ण होण्यात अयशस्वी ठरला तर तो सिलेंडर नष्ट केला जातो. Gas cylinder expiry.

सुरक्षित रहा!

आपल्या घरातील सर्व गॅस सिलेंडरची एक्सपायरी तारीख तपासण्यासाठी आजच वेळ काढा.

अधिक माहिती साठी वेबसाईट ला भेट द्या : https://my.ebharatgas.com/bharatgas/Home/Index

Notes RBI Update: नोटांवर महात्मा गांधींच्याऐवजी इतर व्यक्तींचा फोटो? RBI ने केले स्पष्टीकरण

Leave a Comment