Pune Metro : पुणे मेट्रोतील तरुणाईचा ‘नादखुळा’; व्हायरल व्हिडिओ पाहून हसून लोटपोट व्हाल!

Pune Metro: पुणे आणि पुणेकरांची चर्चा नेहमीच रंगत असते. पुणेकरांचा मजेदार स्वभाव आणि त्यांच्या खास पाट्या नेहमीच लोकांचे लक्ष वेधून घेतात. पुणेकर कधी काय करतील याचा नेम नसतो. याचाच प्रत्यय देणारा एक व्हायरल व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

Pune Metro मध्ये प्रवास करत असताना काही तरुणांनी असा काही ‘नाद’ केला की, तो पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.

Pune Metro आता अत्याधुनिक झाली आहे. दर 10 मिनिटांनी मेट्रो धावते. मेट्रोमध्ये एसीची सोय आहे. सरकते जिने आणि लिफ्टची सुविधा देखील आहे. बसून किंवा उभे राहून आरामात प्रवास करता येईल अशी प्रशस्त जागा आहे. इथे रेल्वे प्रवासासारखी गर्दी नसते. अत्यंत शिस्तीने प्रवास पार पडतो. मेट्रो प्रवासा दरम्यान येणाऱ्या प्रत्येक स्टेशनची माहिती दरवाज्याच्यावरील स्क्रीनवर दिसते. स्टेशन येताच रेकॉर्डेड आवाजामध्ये स्टेशनचे नाव ऐकू येते.

पण काही लोकांना शांततेतील मेट्रो प्रवास नकोसा वाटत असावा. म्हणूनच काही तरुण मेट्रोमध्ये रेल्वे प्रवासाचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

या व्हायरल व्हिडिओमध्ये काही तरुण स्टेशनजवळ येताच रेकॉर्डेड आवाजाची नक्कल करताना दिसत आहेत. “पुढचे स्टेशन जिल्हा न्यायालय, उतरताना डाव्या बाजूने उतरा” असे ते तरुण म्हणतात.

त्यानंतर हे तरुण रेल्वेत फिरणाऱ्या विक्रेत्यांप्रमाणे आवाज काढत म्हणतात, “जेली, चॉकलेट, लेमनगोळी, ओली भेळ, पाणी बॉटल आहे, लोणवळा चिक्की, 100 ला चार आहे”.

या तरुणांच्या या मजेदार कृतीमुळे त्यांच्यासोबत असलेले इतर तरुण हसतात. प्रवासी देखील त्यांच्याकडे आश्चर्याने पाहतात.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. इंस्टाग्रामवर punerikataa नावाच्या पेजवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. “पोरांनी तर नादच केला. पुण्यात नमुन्यांची कमी नाही” असे कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आले आहे.

या व्हिडिओवर अनेक मजेदार कमेंट्स येत आहेत. एका युजरने कमेंट करत म्हटले आहे की, “अहो, आमच्या पुणेकरांना नमुने बोलता होय? नमुने नाही बोलत याला, प्रत्येक क्षणी जगण्याची मजा घेतो आम्ही पुणेकर, टेन्शन नाही घेत राव! म्हणूनच तर बोलतात पुणे तिथे काय उणे, माझे पुण्यावर प्रेम आहे.”

दुसऱ्या एका युजरने कमेंट केली, “पुणेकरांचा जगण्याचा हटके अंदाज आहे. स्वतःही खुश राहतात आणि स्वतःबरोबर दुसऱ्यांनाही खुश ठेवतात.”

पुणेकरांच्या या ‘नादखुळा’ अंदाजाने सोशल मीडियावर एकच हशा पिकवला आहे.

Leave a Comment